Gold Rate: सोने-चांदीच्या दरांनी गाठला उच्चांक! मुंबई-पुण्यातील सोन्याचे दर किती रुपयांनी महागले?

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि अमेरिकी बॉण्डवरील परतावा घटल्यामुळे बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात 1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर गुंतवणूकदार अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाची

Gold Rate: सोने-चांदीच्या दरांनी गाठला उच्चांक! मुंबई-पुण्यातील सोन्याचे दर किती रुपयांनी महागले?

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि अमेरिकी बॉण्डवरील परतावा घटल्यामुळे बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात 1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर गुंतवणूकदार अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयाची वाट पाहत होते. सकाळी सुमारे 10:45 वाजता, सोन्याचे वायदे (ऑक्टोबर) 1,58,598 रुपयांवर व्यवहार करत होते, ज्यात 0.52 टक्के किंवा 819 रुपयांची वाढ झाली होती. या धातूने आतापर्यंत दिवसभरात 1,52,100 रुपयांचा उच्चांक नोंदवला, जो जवळपास 1 टक्का किंवा 1,299 रुपयांनी वाढला होता. तर दिवसभरातील नीच्चांक 1,54,450 रुपयांवर पोहोचला,

Goodreturns नुसार आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 24 कॅरेट 10 तोळं सोन्याच्या किमतीत 2,900 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव स्थिर आहेत, पण MCX वायदे बाजारात चांदीने 2,969 रुपयांची उसळी घेतली आहे.1 ग्रॅम चांदीची किंमत 245 रुपये असून 1 किलो चांदीचा भाव 2,35,000 रुपये आहे. 

आजचे भाव काय आहेत?
MCX वर सोनं 1 लाख 58 हजार रुपयांच्या पुढे गेलं आहे. तर चांदी 2 लाख 35 हजार रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा – UPI Payment Charges: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार होणार मोफत; वाचा सविस्तर माहिती

मुंबई-पुण्यातील सोन्याची रक्कम (Gold Rate in Mumbai-Pune)
24 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम – 15,384
8 ग्रॅम – 1,22,052
10 ग्रॅम – 1,53,440
100 ग्रॅम – 15,34,440

22 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम – 14,069
8 ग्रॅम – 1,12,520
10 ग्रॅम – 1,40,650

18 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम – 11,508
8 ग्रॅम – 92,064
10 ग्रॅम – 1,15,080

पुढे काय होईल?
तज्ञांच्या मते, सोने 1 लाख 55 हजार च्या वर टिकले तर ते 1 लाख 57 हजार पर्यंत जाऊ शकते. पण 1 लाख 50 हजार च्या खाली आले तर थोडे स्वस्त होईल.
चांदी सुद्धा 2 लाख 40 हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात – सध्या सोने खरेदी करायची असेल तर भाव जास्त आहेत, ग्राहकांनी थोडी वाट पाहिलेली बरी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number