Todays Gold Rate : सणासुदीपूर्वी ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! सोने-चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे.

Todays Gold Rate : सणासुदीपूर्वी ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! सोने-चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. सोन्याच्या व चांदीच्या दरात काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असतानाच चित्र अद्यापही कायम आहे. आज गेल्या आठ दिवसाचा जर विचार केला तर सोने व चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळाला आहे.

तर आज पुन्हा सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची तर चांदीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाली असून सर्वसामान्य ग्राहकांना याचा दिलासा मिळत आहे. आजचा सोन्याचा दर जीएसटीसह एक लाख 47 हजार 290 तर चांदीचा दर जीएसटीसह दोन लाख 29 हजार 690 आहे. 

हेही वाचा- Gold-Silver Rate Today: सराफा बाजारात पुन्हा तेजीची लाट; सोने-चांदी महाग, पाहा 22 आणि 24 कॅरेटचा भाव

तर मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमनुसार समोर आले आहेत. मुंबईत 22 कॅरेटचा भाव 1,47,690 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोने 1,61,120 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेटचा भाव 1,47,690 रुपये आहे, तर 24 कॅरेट  1,61,120 रुपये आहे.

नाशिक 22 कॅरेटचा भाव 1,47,740 रुपये आहे, तर 24 कॅरेट  1,61,150 रुपये आहे. नागपूर 22 कॅरेटचा भाव 1,47,690 रुपये आहे, तर 24 कॅरेट 1,61,120 रुपये आहे. सोन्यातील घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम हा सोने व चांदीच्या दरावर पडत असल्याचे मत सोने तज्ज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number