Solapur Crime News : एकाच मुलीवर दोघांचं प्रेम! एकाने लग्न केलं…दुसऱ्याने गेम केला, प्रेयसीच्या पतीवर धारदार कोयत्याने सपासप वार; आरोपी गजाआड

सोलापूर : सोलापुरात एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीची धारदार कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील एका कंपनीसमोर रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या वीस वर्षांचा असणाऱ्या सिद्धाराम कैलास कटप असे रिक्षा चालवणाऱ्या युवकावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी 19 वर्षाच्या संतोष महादेव […]

Solapur Crime News : एकाच मुलीवर दोघांचं प्रेम! एकाने लग्न केलं…दुसऱ्याने गेम केला, प्रेयसीच्या पतीवर धारदार कोयत्याने सपासप वार; आरोपी गजाआड

सोलापूर : सोलापुरात एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीची धारदार कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील एका कंपनीसमोर रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या वीस वर्षांचा असणाऱ्या सिद्धाराम कैलास कटप असे रिक्षा चालवणाऱ्या युवकावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी 19 वर्षाच्या संतोष महादेव पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष आणि सिद्धाराम हे एकाच परिसरात राहतात. परिसरातील एका मुलीवर संतोष पाटील याचं प्रेम होतं. त्यामुळे त्याने त्या मुलीला प्रपोज केलं होतं. मात्र त्या मुलीने नकार दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर 20 एप्रिल रोजी सिद्धाराम आणि त्या मुलीचा विवाह झाला होता. मात्र यांच्या लग्नानंतर संतोष पाटील हा सिद्धाराम कटप याच्यावर राग धरून होता. याच रागातून संतोष यांनी मृत सिद्धाराम याला फोन करून भेटण्यास बोलवले. मात्र त्याचवेळी दोघात वाद झाला. त्यावेळेस संतोष याने कोयत्याने सिद्धाराम याच्यावर थेट हल्ला चढवला आणि एकापाठोपाठ वार केले. यातच सिद्धाराम याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Central Govt Drug Ban: रुग्णांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 16 मिश्र औषधांच्या निर्मिती आणि विक्रीवर तात्काळ बंदी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number