नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या! लोखंडी रॉडने वार करून घेतला गर्लफ्रेंडचा जीव

एका 24 वर्षीय तरुणाने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या 34 वर्षीय प्रियसीची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून हत्या केली आहे. अक्षय दाते असं आरोपीचं नाव आहे.
नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या! लोखंडी रॉडने वार करून घेतला गर्लफ्रेंडचा जीव
Edited Image

नागपूर: नागपूरमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 24 वर्षीय तरुणाने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या 34 वर्षीय प्रियसीची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून हत्या केली आहे. अक्षय दाते असं आरोपीचं नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना गिट्टीखाना पोलिस स्टेशन परिसरात घडली. येथे हेमलता वैद्य तिच्या 8 वर्षांच्या मुलीसह राहत होती. हेमलता विवाहित होती, पण कोरोना साथीच्या काळात तिच्या पतीचे निधन झाले. यानंतर ती एका बिल्डरकडे काम करत होती.

चारित्र्याच्या संशयावरून प्रियसीची हत्या – 

प्राप्त माहितीनुसार, हेमलताचा प्रियकर 24 वर्षीय अक्षय दाते हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. एका बिल्डरकडे काम करणारी हेमलता अनेकदा ग्राहकांशी फोनवर बोलत असे, त्यामुळे अक्षयला संशय यायचा. या संशयामुळे अक्षयने हेमलताची हत्या करण्याचा कट रचला. 

हेही वाचा – अवंतिका एक्स्प्रेसमध्ये महिलेवर चाकूहल्ला; आरोपींना वापी पोलिसांनी घेतलं ताब्यात

अक्षयने हेमलताच्या डोक्यात लोखंडी रॉडने वारंवार वार केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, अक्षय हेमलता मरेपर्यंत लोखंडी रॉडने हल्ला करत होता. त्यानंतर, तो लगेच घटनास्थळावरून पळून गेला. 

हेही वाचा – शिर्डी साईबाबा संस्थानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

दरम्यान, नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अमरावती जिल्ह्यातील तिवासा येथून अटक केली. या हत्येमागील संपूर्ण सत्य शोधण्यासाठी पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात एकचं खळबळ उडाली आहे.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version