घाटकोपरमध्ये केमिकल कारखान्याला लागली आग, अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबईमुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. घाटकोपरमधील असल्फा व्हिलेज येथे  असलेल्या गोडाऊनला रात्री 11.30 वाजायच्या सुमारास आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की या आगीत गारमेंट आणि केमिकलच्या कारखाण्यासह इतर गोडाऊन सुद्धा जाळून खाक झाली आहेत. या आग इतकी मोठ्या प्रमाणत होती की या आगीचे लोट फार दूर वरून दिसत होते. गोडाऊन्समध्ये […]

घाटकोपरमध्ये केमिकल कारखान्याला लागली आग, अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. घाटकोपरमधील असल्फा व्हिलेज येथे  असलेल्या गोडाऊनला रात्री 11.30 वाजायच्या सुमारास आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की या आगीत गारमेंट आणि केमिकलच्या कारखाण्यासह इतर गोडाऊन सुद्धा जाळून खाक झाली आहेत.

या आग इतकी मोठ्या प्रमाणत होती की या आगीचे लोट फार दूर वरून दिसत होते. गोडाऊन्समध्ये गारमेंड आणि केमिकलच सामान असल्यामुळे आगीने चांगलाच जोर धरला होता. आग ही मोठ्या गारमेंट ला लागली आहे. यामध्ये ४० ते ५० दुकाने असल्याचा अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या आणि पाण्याचे  टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.

2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रण करण्यात अग्निशमन दला यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कश्या मुले लागली याच कारण अद्यापही अस्पष्ट आहे. याचा शोध साकिनाका पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.

गारमेंट टेकडीवर असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची कसरत आहेत. आग विझवण्यासाठी पाण्याचे टॅंकर टेकडीच्या खालून आणावे लागत आहेत. गारमेंट मध्ये जाण्यासाठी खूप अडचण असल्याने बांधकाम पाडण्याचे काम सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्त हाणी झाली असून सुदैवाने जीवीत हाणी झाली नाही. आग मोठ्या प्रमाणात लागल्यावुळे प्रदूषण पसरवणारा धुर निर्माण झाला.

गेल्या डिसेंबर महिन्यात खैराणी रोड येथेच भानू फरसाण मार्ट कारखान्याला आग लागून 12 मजुरांचा त्यात होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर, महापालिका जागी झाली होती आणि काही ठिकाणी कारवाई करीत होती मग ह्या गोडाऊन कडे लक्ष का गेले नाही? असा प्रश्न उभा राहतो.

1b1c9e1f-365f-4d3a-88bd-78fd9cfa2ede.jpg

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number