Gateway of India: मोठा अनर्थ टळला! गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरीबोट बंद, 34 प्रवाशांसह 4 क्रू मेंबर्स…

गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्रात अर्धा तास फिरून येणारी 'अन्वरी' फेरीबोट अचानक बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Gateway of India: मोठा अनर्थ टळला! गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरीबोट बंद, 34 प्रवाशांसह 4 क्रू मेंबर्स…

गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्रात अर्धा तास फिरून येणारी ‘अन्वरी’ फेरीबोट अचानक बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठच्या सुमारास (08:30वाजता) ही बोट गेटवे ऑफ इंडियाकडे परत येत होती. परंतु किनाऱ्यापासून 1.5 नॉटिकल मैल अंतरावर असतानाच या बोटीचे इंजिन अकस्मात बिघडले आणि बोट भर समुद्रात बंद पडली. यावेळी 34 पर्यटक आणि 4  क्रू मेंबर गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्रात अर्धा तास फिरून येणाऱ्या ‘अन्वरी’ फेरीबोट मधून प्रवास करत होते. रात्रीची वेळ असल्यामुळे बोटीतील प्रवाशी घाबरले होते, मुंबई पोलिसांनी तातडीने त्यांच्यापर्यंत मदत पोहचवली.

मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे 34 प्रवाशांसह 4 क्रू मेंबर्सचा जीव वाचला. या मदतीमुळे मोठी जीवितहानी टळली असून प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number