कधी शाल तर कधी कानटोपी, गणपती बाप्पालाही बसला थंडीचा कडाका

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर सध्या नागपुरमध्येही थंडीचा जोर वाढलाय. या थंडीपासून बचाव करण्यासाठी  नागपूरकरांनी ठेवणीतील स्वेटर बाहेर काढलेत. त्याचप्रमाणे, आपल्या लाडक्या बाप्पाचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी बाप्पाला सुद्धा स्वेटर घातलं गेलंय. नागपूरच्या प्रतापनगर मधील गणेश मंदिरात बाप्पाच्या मूर्तीला स्वेटर घालण्यात आलाय. थंडीनुसार कधी शाल तर कधी कानटोपी बाप्पाला घातली जाते. जशी आपल्याला थंडी लागतेय तशीच बाप्पाला […]

कधी शाल तर कधी कानटोपी, गणपती बाप्पालाही बसला थंडीचा कडाका

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

सध्या नागपुरमध्येही थंडीचा जोर वाढलाय. या थंडीपासून बचाव करण्यासाठी  नागपूरकरांनी ठेवणीतील स्वेटर बाहेर काढलेत. त्याचप्रमाणे, आपल्या लाडक्या बाप्पाचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी बाप्पाला सुद्धा स्वेटर घातलं गेलंय. नागपूरच्या प्रतापनगर मधील गणेश मंदिरात बाप्पाच्या मूर्तीला स्वेटर घालण्यात आलाय. थंडीनुसार कधी शाल तर कधी कानटोपी बाप्पाला घातली जाते. जशी आपल्याला थंडी लागतेय तशीच बाप्पाला सुद्धा थंडी लागतेय. म्हणून बाप्पाला स्वेटर घालून देण्यात येत असल्याचे भक्तांचे मत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number