तुर्कस्थानचा रेकॉर्डमोडीत, गडचिरोली जिल्ह्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे सतत चर्चेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यानं नवी ओळख मिळवली आहे. जिल्हयाच नाव आज जागतिक पातळीवर गेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांच्या अनोख्या उपक्रमाची नोंद आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीये. समाजात शांतता प्रस्थापीत होण्यासाठी अहिंसा आणि शांतता संदेश वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आलाये. गडचिरोलीतील पोलीसांनी मैदानावर अहिंसा आणि शांतता संदेश […]

तुर्कस्थानचा रेकॉर्डमोडीत, गडचिरोली जिल्ह्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली

माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे सतत चर्चेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यानं नवी ओळख मिळवली आहे. जिल्हयाच नाव आज जागतिक पातळीवर गेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांच्या अनोख्या उपक्रमाची नोंद आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीये. समाजात शांतता प्रस्थापीत होण्यासाठी अहिंसा आणि शांतता संदेश वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आलाये. गडचिरोलीतील पोलीसांनी मैदानावर अहिंसा आणि शांतता संदेश वाचनाचा उपक्रम पार पडला आहे.

नवल म्हणजे 7041 नागरीकांनी या उपक्रमात सहभाग घेतलेले होता. यावेळी साधु संतांनी आपल्या शिवणीतून दिलेल्या संदेशाचं वाचन केल होत. जगात अण्वस्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्माण सुरू असताना जगावर महायुद्धाचं सावट घोंगावतं आहे. यात शांतता आणि अहिंसेची प्रार्थनाकरून नागरीकांनी जगासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

याआधी तुर्कस्थानमध्ये देखील अशा प्रकारचा विक्रम करण्यात आला होता. मात्र गडचिरोलीतील नागरीकांनी हा रेकॉर्ड मागे टाकत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केलीये.

गडचिरोली नेहमीच माओवादी पोलीस यांच्या चकमकी तर कधी माओवाद्यांच्या कारवाय यामुळे चर्चेत असतो. या वेगळया पध्दतीन मिळालेल्या ओळखीचा हा शिक्का पुसण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली पोलीस आणि पुण्याचा आदर्श मिञमंडळ उडाण फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातुन झाला या उपक्रमाचे साक्षीदार ठरले.

समाजामध्ये शांतता व समतेचा प्रसार व्हावा, जगात शांतता नांदावी यासाठी अहिंसा व शांतता संदेश वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

gad-chiroli1.png

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number