रावत पती-पत्नीचे पार्थिव एकाच सरणावर

तामिळनाडूमधील हेलिकॉप्टरच्या अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ अधिकाऱ्यांचे निधन झाले. बिपीन रावत, यांच्यासह इतरांचे पार्थिव काल दिल्लीत आणण्यात आले. आज दिल्लीतील लष्करी छावणीत संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांच्यासह इंतरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीडीएस […]

रावत पती-पत्नीचे पार्थिव एकाच सरणावर

तामिळनाडूमधील हेलिकॉप्टरच्या अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ अधिकाऱ्यांचे निधन झाले. बिपीन रावत, यांच्यासह इतरांचे पार्थिव काल दिल्लीत आणण्यात आले. आज दिल्लीतील लष्करी छावणीत संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांच्यासह इंतरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिवावर दिल्लीतील लष्करी छावणीतील ब्रार चौकातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवटच्या श्वासापर्यंत रावत पती-पत्नीसोबत राहिले असून त्यांच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात  आले.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांची अंत्ययात्रा काढली असून या शोकाकूल वातावरणात अनेक नागरिक सहभागी झाले. त्यानंतर लष्करी वाहनातून त्यांचे पार्थिव स्मशानभूमीकडे नेण्यात आले. लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे, वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number