जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापूर विद्यापीठातल्या 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरात हे विद्यार्थी गेले होते.
रात्री जेवणानंतर त्यांना चक्कर आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, भंडारा आणि जालन्याच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.