Abhijeet Dipke : ‘व्यवस्था अजून किती प्रथमेशचा जीव घेणार?’; अभिजीत दीपकेंचा सवाल, प्रथमेशच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

उदय साबळे पाटील, प्रतिनिधी  धाराशिव : एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश दिलीप देशमुख (वय 28 वर्ष) या तरुणाने पुण्यातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल घडली. प्रथमेश हा मूळचा रा. खासापुरी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव येथील असून मागील दीड ते दोन वर्षांपासून पुण्यात राहत होता. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज, गुरुवारी […]

Abhijeet Dipke : ‘व्यवस्था अजून किती प्रथमेशचा जीव घेणार?’; अभिजीत दीपकेंचा सवाल, प्रथमेशच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

उदय साबळे पाटील, प्रतिनिधी 

धाराशिव : एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश दिलीप देशमुख (वय 28 वर्ष) या तरुणाने पुण्यातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल घडली. प्रथमेश हा मूळचा रा. खासापुरी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव येथील असून मागील दीड ते दोन वर्षांपासून पुण्यात राहत होता. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज, गुरुवारी धाराशिव येथील त्याच्या घरी जाऊन प्रथमेशच्या आईची तसेच कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेत अभिजीतने प्रथमेशचा बळी हा व्यवस्थेने घेतला असल्याचा आरोप केला आहे. 

या सर्व घटनांना जबाबदार धरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा व सचिवचा राजीनामा झाला पाहिजे, अशी भूमिका दीपकेंनी मांडली. अभिजीत दीपके म्हणाले की, प्रथमेश देशमुखची आत्महत्या हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. यासाठी महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थांना सोबत घेऊन आंदोलन करणार. प्रथमेशवर असलेले कर्ज सरकारने दिले पाहिजे. प्रथमेशची आई पत्र्याच्या घरात रहातेय. त्यांना घर बांधून दिले पाहिजे. 

देशात आणि राज्यात परीक्षा व्यवस्थित होत नसल्याने तरुणांनी काय करायचे, असा सवाल सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला. राठवाडा आणि विदर्भातील तरुण मोठी स्वप्ने घेऊन पुणे-मुंबईत अभ्यासासाठी येतात. एका खोलीत दहा-दहा विद्यार्थी राहून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, तांत्रिक अडचणी आणि पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप दीपके यांनी केला. “व्यवस्थेने केलेला हा मर्डर आहे. अजून किती प्रथमेशचा जीव घेणार आहात?” असा संतप्त सवाल त्यांनी केला प्रथमेश देशमुखच्या कुटुंबाची भेट घेऊन दीपके यांनी सरकारवर निशाणा साधला. “एका तरी मंत्र्याने प्रथमेशच्या घरी फोन केला का? सरकारमधील कोण? त्याच्या कुटुंबासोबत उभे राहिले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “प्रथमेशच्या आईला एकटं रडावं लागत आहे. तिच्यासोबत कोण उभं राहणार? तिला या संकटातून कोण बाहेर काढणार?” असा सवालही त्यांनी केला. शेती शिवार करपल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचे सांगत, केवळ परीक्षा पुढे ढकलून प्रश्न सुटणार नाही, अशी टीका दीपके यांनी केली. “परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार? निकाल पुढे, परीक्षा पुढे… सिस्टम नीट कधी होणार?” असा सवाल त्यांनी केला. प्रथमेशला आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला असेल, तर “एका युवकासाठी अडीच लाखांचे कर्ज मोठे ठरते आणि दुसरीकडे उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ होतात,” असा आरोप करत त्यांनी सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अनेक समित्या स्थापन झाल्या, मात्र त्यातून ठोस काय साध्य झाले, असा सवाल करत परीक्षा व्यवस्था सुधारण्याची आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला. “देशातील युवकांची मागणी एकच आहे, परीक्षा व्यवस्थित घ्या.” दरम्यान, कितीही तणावाची परिस्थिती असली तरी विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही अभिजीत दीपके यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number