Bhuleshwar Incident : बाप्पाच्या मिरवणुकीसाठी सुरक्षा प्रमाणपत्र गरजेचं? भुलेश्वर गणेश दुर्घटनेनंतर पालिकेने केला मोठा खुलासा

भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर आता एक टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तीसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Bhuleshwar Incident : बाप्पाच्या मिरवणुकीसाठी सुरक्षा प्रमाणपत्र गरजेचं? भुलेश्वर गणेश दुर्घटनेनंतर पालिकेने केला मोठा खुलासा

गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी बीएमसी प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर आता एक टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तीसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

यासोबतच मूर्तीची ऑर्डर दिल्याच्या वेळेपासून ते मूर्ती तयार होऊन मंडळात येईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे. जड मूर्तीच्या आगमनादरम्यान अपघातांचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवणार. या संदर्भात एक विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी डीएमसी झोन 2 चे अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा- Mazgaoncha Morya Aagman : बाप्पाचा आगमन सोहळा! मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांवर अंडीफेक; अखेर 36 तासांनंतर आरोपी अटकेत

या बैठकीत मूर्तीची सुरक्षा, योग्यता प्रमाणपत्रे आणि त्यांच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांना अंतिम रूप दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्ते विभाग आणि सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना गणेशोत्सवादरम्यान मूर्तीच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी वापरले जाणारे रस्ते खड्डेमुक्त ठेवण्याचे निर्देश दिलेत. 

अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे. गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य करण्याचा कोणताही निर्णय BMCने घेतलेला नाही. एक टनापेक्षा अधिक वजनाच्या मूर्तींसाठीही असे प्रमाणपत्र बंधनकारक नसल्याचे पालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. त्याचसोबत मूर्तीच्या जडणघडणीपासून वितरणापर्यंतची माहिती नोंदवणेही बंधनकारक नसून सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा खोट्या माहितीकडे दुर्लक्ष करण्याचे BMCने आवाहन केले आहे. गणेशमूर्ती आगमनावेळी पोलीस, वाहतूक विभाग आणि BMCशी समन्वय साधून सुरक्षेची काळजी घ्यावी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number