मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजावतरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजावतरणसंपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात शक्रवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजावतरण करून ध्वजवंदन केले. […]

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजावतरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजावतरणसंपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात शक्रवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजावतरण करून ध्वजवंदन केले. याप्रसंगी उपस्थित पोलीस बांधवासोबत राष्ट्रध्वजाला सलामी देत वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या समस्त पोलीस बांधवाना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासहित मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या सर्व साडेबारा कोटी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मनापासून विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र सरकार राज्याच्या विकासाचे अनेक कामे करत आहे, यासोबतच पायाभूत विकासासाठी देखील प्रयत्नशील आहे असं शिंदे म्हणाले. याशिवाय राज्यातील बहुतांश ठिकाणी पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रध्वज फडकविला आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल असं विचारण्यात आले होते त्यावर शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येईल असं म्हंटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number