जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले आहे. शनिवारी रात्री माथेरानमधील 3 दुकानांना आग लागली. दुकानांमध्ये आग विझवण्याचे प्राथमिक उपाय नसल्यानं आगीचा अधिकच भडका उडाला. त्यातच माथेरानच्या रस्त्यावरुन येण्यास अग्निशमन दलाच्या वाहनाला खूप अडचणी आल्या. अखेर तिथल्या स्थानिक तरुणांनी तब्बल 3 तासांच्या प्रयत्नांनर आगीवर नियंत्रण मिळवलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.