Fire At The Income Tax Office : चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी, परिसरात धुराचे लोट

मुंबई : चर्चगेट स्टेशन जवळच्या आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशन दलाच्या जवनांकडून ही आग विझवण्याचे, ती आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली ते कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. चर्चगेट  स्टेशनजवळ असलेल्या आयकर विभागच्या कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे […]

Fire At The Income Tax Office : चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी, परिसरात धुराचे लोट

मुंबई : चर्चगेट स्टेशन जवळच्या आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशन दलाच्या जवनांकडून ही आग विझवण्याचे, ती आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली ते कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. चर्चगेट  स्टेशनजवळ असलेल्या आयकर विभागच्या कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. तसेच नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. आग लागली तेव्हा आयकर विभागाच्या कार्यालयात काही कर्मचारी देखील  होते. मात्र आगीचे वृत्त समजताच त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे काहीशी धावपळ उडाली होती. आता कार्यालयात आणखी कोणी अडकलं आहे का, याचा शोध घेतला जात असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा : Hotel Fire: भल्या पहाटे भयंकर दुर्घटना; हॉटेलला लागलेल्या आगीत झोपेतच 7 जणांचा होरपळून मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number