Amravati Hospital Fire : अमरावतीत हाहाकार! अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटेच अग्नितांडव; तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे.

Amravati Hospital Fire : अमरावतीत हाहाकार! अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटेच अग्नितांडव;  तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एसएनसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पहाटे 3.30 वाजता अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे.

आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली. आग लागली त्यावेळी नवजात शिशु कक्षात तब्बल 39 लहान बाळं दाखल होती. आग लागल्या बरोबर व्हेंटिलेटर मधून ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत अनेक बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले असून अनेक बालकांचा जीव वाचवण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

हेही वाचा- Crime News: क्रूरतेचा कळस! घरगुती वादातून पती अन् सासूने बळजबरीने पाजलं टॉयलेट क्लिनर; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, आगीतून बाहेर काढण्यात आलेल्या सहा बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावरील असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली.

दुर्घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली का? यासह रुग्णालयातील विद्युत यंत्रणा आणि इतर सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी केली जात आहे. नवजात शिशु कक्षात अशा प्रकारची घटना नेमकी कशी घडली? सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का? याचा तपास केला जाणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number