Satara News : भयंकर! गणपती आगमन सोहळ्याला गालबोट; मिरवणुकीत आगीचा भडका उडाल्याने भाविकांमध्ये गोंधळ

सातारा : सातारा जिल्ह्यातील राजवाडा बस थांबा परिसरात एका आगीच्या दुर्घटनेने गणपती मिरवणूक सोहळ्याला गालबोट लागले. ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या मिरवणुकीतील हलत्या ‘डायनासॉर’ देखाव्याने अचानक पेट घेतल्याने हजारो भाविकांची एकच तारांबळ उडाली. ​‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ध्वनिवर्धकाच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईच्या उत्साहात साताऱ्यात रात्री गणेशोत्सवाचा आगमन सोहळा पार पडला. त्यावेळी मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली. बुधवारी रात्री […]

Satara News : भयंकर! गणपती आगमन सोहळ्याला गालबोट; मिरवणुकीत आगीचा भडका उडाल्याने भाविकांमध्ये गोंधळ

सातारा : सातारा जिल्ह्यातील राजवाडा बस थांबा परिसरात एका आगीच्या दुर्घटनेने गणपती मिरवणूक सोहळ्याला गालबोट लागले. ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या मिरवणुकीतील हलत्या ‘डायनासॉर’ देखाव्याने अचानक पेट घेतल्याने हजारो भाविकांची एकच तारांबळ उडाली. ​‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ध्वनिवर्धकाच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईच्या उत्साहात साताऱ्यात रात्री गणेशोत्सवाचा आगमन सोहळा पार पडला. त्यावेळी मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली. बुधवारी रात्री साताऱ्यातील मानाचा आझाद हिंद मंडळ, समता पार्क, नर्मदेश्वर, शिवतेज आणि सह्याद्रीचा राजा यांसारख्या प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे आगमन सोहळे धुमधडाक्यात निघाले होते. राजवाडा बस थांबा हा मिरवणुकांचा केंद्रबिंदू असल्याने तेथे भाविकांची मोठी गर्दी जमली होती. ‘सह्याद्रीच्या राजा’ची पहिली झलक पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली असतानाच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे गणेशमूर्तीजवळील हलत्या डायनासॉरने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने उपस्थितांमध्ये घबराट पसरली.

हेही वाचा : Rakesh Mehta : दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांनी 74 व्या वर्षी राहत्या घरी घेतला गळफास; चिठ्ठीमधून धक्कादायक कारणांचा खुलासा

दरम्यान, तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत आग लागलेल्या ट्रॉलीपासून श्रींची मूर्ती, जनरेटर आणि ध्वनियंत्रणा सुरक्षितरीत्या बाजूला हलवली. कार्यकर्त्यांनी बादल्यांतून पाण्याचा मारा सुरू केला. तर काही वेळातच नगरपालिकेचा अग्निशमन बंबही तेथे दाखल झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number