डीजे लावण्यावरून पुण्यातील टिळक रस्त्यावर पोलीस आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते भिडले.
टिळक रस्त्यावरील एस पी महाविद्यालयासमोर एका गणेश मंडळासमोर डीजेचा दणदणाट सुरू होता. यावेळी त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाज कमी करण्याचे आवाहन केले. परंतु मंडळाच्या कार्यकर्त्यांनी न ऐकता डीजेचा दणदणाट सुरूच ठेवला.
त्यानंतर पोलिसांनी स्वतः वर चढून डीजे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळासाठी या रस्त्यावरील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. काही वेळाने पुन्हा मर्यादित आवाज ठेवत डीजे चालू करण्यात आला आणि मिरवणूक मार्गस्थ झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.