FIFA World Cup 2026 Schedule: फुटबॉलप्रेमींसाठी सर्वात मोठा उत्सव असलेला फिफा विश्वचषक 2026 आता काहीच महिन्यांवर आला आहे. या वेळी विश्वचषकाचा इतिहास बदलणार आहे, कारण पहिल्यांदाच 32 नव्हे तर तब्बल 48 संघ विजेतेपदाच्या शर्यतीत उतरतील. कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका हे तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करत असून एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे हा विश्वचषक सर्वात मोठा आणि सर्वाधिक रंगतदार ठरणार आहे.
उद्घाटन सामन्याने वाढणार रंगत
स्पर्धेची सुरुवात 11 जून 2026 रोजी मेक्सिको सिटीमध्ये होणार आहे. दुपारी 3.00 वाजता (स्थानिक वेळेनुसार) होणाऱ्या या सामन्यात मेक्सिकोचा संघ घरच्या प्रेक्षकांसमोर मैदानात उतरणार असल्याने उद्घाटन सामना अत्यंत रोमहर्षक ठरण्याची शक्यता आहे.
अंतिम सामना न्यूयॉर्क-न्यू जर्सीमध्ये
या स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर (सध्याचे मेटलाइफ स्टेडियम) रंगणार आहे. प्रायोजकत्वाच्या धोरणामुळे फिफाने या विश्वचषकातील सर्व स्टेडियमची नावे तात्पुरती बदलली आहेत. या स्पर्धेत 12 गट असतील आणि प्रत्येक गटात 4 संघ. प्रत्येक संघाला गटात तीन सामने खेळावे लागतील.
काही महत्वाचे गट पुढीलप्रमाणे:
गट अ: मेक्सिको, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क / मॅसेडोनिया / चेक गणराज्य / आयर्लंड
गट ब: कॅनडा, स्वित्झर्लंड, कतार, इटली / उत्तर आयर्लंड / वेल्स / बोस्निया
गट क: ब्राझील, मोरोक्को, स्कॉटलंड, हैती
गट ड: अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॅराग्वे, तुर्की / रोमानिया / स्लोवाकिया / कोसोवो
गट इ: जर्मनी, इक्वेडोर, आयव्हरी कोस्ट, कुराकाओ
गट फ: नेदरलँड्स, जपान, ट्युनिशिया, युक्रेन / स्वीडन / पोलंड / अल्बानिया
गट ग: बेल्जियम, इराण, इजिप्त, न्यूझीलंड
गट ह: स्पेन, उरुग्वे, सौदी अरेबिया, केप वर्दे
गट प: फ्रान्स, सेनेगल, नॉर्वे, इराक / बोलिव्हिया / सुरीनाम
गट ज: अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, अल्जेरिया, जॉर्डन
गट क: पोर्तुगाल, कोलंबिया, उझबेकिस्तान, डीआरसी / जमैका / न्यू कॅलेडोनिया
गट ल: इंग्लंड, क्रोएशिया, घाना, पनामा
यामध्ये केप वर्दे, कुराकाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे 4 संघ पहिल्यांदाच विश्वचषकात पदार्पण करत आहेत.
संपूर्ण विश्वचषक वेळापत्रक
गट टप्पा: 11 जून – 27 जून
32 फेरी: 28 जून – 3 जुलै
16 फेरी: 4 जुलै – 7 जुलै
उपांत्यपूर्व फेरी: 9 जुलै – 11 जुलै
उपांत्य फेरी: 14 जुलै – 15 जुलै
तिसऱ्या स्थानासाठीचा सामना: 18 जुलै
अंतिम सामना: 19 जुलै
हेही वाचा – Palash Muchhal : "कठोर कायदेशीर कारवाई करणार" स्मृती मानधनाच्या स्टोरीनंतर पलाशचा थेट कायदेशीर इशारा
या वेळी 32 फेरी नावाची एक अतिरिक्त नॉकआउट फेरी जोडण्यात आली आहे, ज्यामुळे स्पर्धेची रोमांचकता वाढणार आहेत. फिफा विश्वचषक 2026 हा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा ठरणार आहे. आता जगभरातल्या चाहत्यांच्या नजरा 11 जूनकडे लागल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.