FDA Action : हॉटेल ‘चूल मटन’वर FDAची धडक कारवाई! स्वच्छतेपासून आरोग्य नियमांपर्यंत अनेक त्रुटी; थेट परवाना निलंबित

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने पुण्यातील लोहगाव येथील नगर रस्ता परिसरातील जुना खराडी जकात नाका, खांदवे नगर येथील ‘चुल मटण’ या प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई केली होती.

FDA Action : हॉटेल ‘चूल मटन’वर FDAची धडक कारवाई! स्वच्छतेपासून आरोग्य नियमांपर्यंत अनेक त्रुटी; थेट परवाना निलंबित

पुण्यातील लोहेगावातील प्रसिद्ध ‘चुल मटण’ या हॉटेल अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने पुण्यातील लोहगाव येथील नगर रस्ता परिसरातील जुना खराडी जकात नाका, खांदवे नगर येथील ‘चुल मटण’ या प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान अस्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

हेही वाचा- Education Ministry Meeting : शिक्षण मंत्रालयाचा मोठा ॲक्शन मोड! 600 तज्ज्ञांना देखवला थेट घरचा रस्ता; कार्यालयांच्या सुरक्षेसाठी मंत्रालयाचा मोठा निर्णय

हॉटेलच्या तपासणीदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे पालन होत नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता नसल्याचे आढळले. या गंभीर अनियमिततांमुळे अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा परवाना तत्काळ निलंबित केला.

दरम्यान आवश्यक सुधारणा पूर्ण होईपर्यंत अन्न व्यवसाय करण्यास मनाई केली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून राज्यभरात अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी तपासणी मोहीम सुरू आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेलवर अशी कारवाई झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number