FDA Raid: ग्राहकांच्या जीवाशी खेळ? एक्स्पायरी डेट बदलून मालाची विक्री; नवी मुंबईत 75 लाखांचा साठा जप्त

नवी मुंबईतील तुर्भे परिसरात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

FDA Raid: ग्राहकांच्या जीवाशी खेळ? एक्स्पायरी डेट बदलून मालाची विक्री; नवी मुंबईत 75 लाखांचा साठा जप्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे परिसरात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुदत संपलेल्या अन्नपदार्थांवरील उत्पादन आणि एक्सपायरी डेट बदलून त्यांची पुन्हा बाजारात विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत तब्बल 75 लाख 29 हजार 261 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही महिन्यांपासून एफडीएने राज्यभरात अन्नसुरक्षेबाबत कारवायांची गती वाढवली आहे. त्याचाच भाग म्हणून 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2026 दरम्यान तुर्भे आणि नवी मुंबई परिसरातील काही गोदामांवर छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान अनेक उत्पादनांवरील मूळ लेबल काढून त्यावर नवीन उत्पादन तारीख आणि मुदत संपण्याची तारीख असलेले बनावट लेबल चिकटवले जात असल्याचे समोर आले.

हेही वाचा: Crime News : पार्टीत चिकनचे पीस जास्त खाण्यावरून वाद… आरोपीने मित्राला चाकू भोसकून संपवलं

कारवाईदरम्यान विविध नामांकित निर्यातदार कंपन्यांशी संबंधित 4,411 कार्टन अन्नपदार्थ, तसेच विनालेबल आणि मुदतबाह्य वस्तू जप्त करण्यात आल्या. या प्रकारामुळे ग्राहकांना नकळत खराब किंवा कालबाह्य अन्नपदार्थ विकले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

एफडीएने या प्रकरणी संबंधित गोदामे आणि आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार तुर्भे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या तपासात आणखी काही गोदामे किंवा पुरवठा साखळीतील इतर घटकांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची तपासणी आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून संबंधितांकडे चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: Phaltan Doctor News : फलटणमधील आणखी एका डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल! सायन स्टेशनवरच घडला धक्कादायक प्रकार 29 ऑगस्टला इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे..

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

एफडीएने नागरिकांना अन्नपदार्थ खरेदी करताना पॅकेजवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट, सील आणि लेबल नीट तपासण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद उत्पादन आढळल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number