Tukaram Mundhe FDA, Ashadhi Wari 2026 : 217 हॉटेल, 3 आस्थापनांचे परवाने निलंबित, 20 विशेष पथके…, आषाढी वारी निमित्त FDA अलर्ट मोडवर; पंढरपुरात धडक तपासणी सुरु

तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) सूत्रे हाती घेताच राज्यात भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. आता आषाढी वारी निमित्त अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Tukaram Mundhe FDA, Ashadhi Wari 2026 : 217 हॉटेल, 3 आस्थापनांचे परवाने निलंबित, 20 विशेष पथके…, आषाढी वारी निमित्त FDA अलर्ट मोडवर; पंढरपुरात धडक तपासणी सुरु

तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) सूत्रे हाती घेताच राज्यात भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या या कारवाईचे राज्यभरातून स्वागत होत आहे. यानंतर आता आषाढी वारी निमित्त अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- Pandharpur VIP Darshan Ban: पंढरपुरात VIP दर्शनाबाबत जिल्हा प्रशासनाचे कडक पाऊल; नियम मोडल्यास थेट…

यावेळी सोलापूर शहरातील 217 हॉटेल, खानावळी, मिठाई दुकाने व प्रसाद विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच विविध अन्नपदार्थांचे 172 नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी जप्त करण्यात आल्याचे ही समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 आस्थापनांचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी मंगलमुर्ती मिसळ व भेळ, हॉटेल स्वरा अ‍ॅण्ड चायनिज सेंटर आणि हॉटेल श्री विष्णु सहस्रनाम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

वारकऱ्यांना शुद्ध, सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेदरम्यान आषाढी वारी 2026 साठी 20 विशेष पथके कार्यरत असून या मोहिमे अंतर्गत स्वच्छता, अन्न साठवणूक, तेल, रंग व इतर खाद्य घटकांची काटेकोर तपासणी एफडीएकडून करण्यात येणार आहे. निकृष्ट किंवा भेसळयुक्त अन्न आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number