Gondia Accident : गोंदिया-बालाघाट महामार्गावर मृत्यूचा सापळा! भरधाव ट्रक-बोलेरोच्या जोरदार धडकेत 6 जणांचा मृत्यू, तर 7 जणांची प्रकृती गंभीर

गोंदियाच्या नागरा येथे गोंदिया बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Gondia Accident : गोंदिया-बालाघाट महामार्गावर मृत्यूचा सापळा! भरधाव ट्रक-बोलेरोच्या जोरदार धडकेत 6 जणांचा मृत्यू, तर 7 जणांची प्रकृती गंभीर

गोंदियाच्या नागरा येथे गोंदिया बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया कडून बालाघाटच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने बालाघाट कडून गोंदियाकडे येणाऱ्या बोलेरो प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून 6 लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हेही वाचा- Hingoli Accident : हिंगोलीत मन हेलावणारी दुर्घटना! रिक्षा अन् पिकअपची भीषण धडक; चार जणं दगावले, एक गंभीर जखमी

तरी तर 7 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृत्यू झालेले सगळे प्रवासी हे मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. अपघाताचा भीषण आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पिकअपमध्ये अडकलेल्या जखमींना आणि मृतदेहांना मोठ्या शर्थीन बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

या भीषण अपघातामुळे गोंदिया-बालाघाट महामार्गावर काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. या अपघातातील मृत्यू झालेले सर्व प्रवासी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, मृत आणि जखमी प्रवाशांची अधिकृत ओळख तसेच अपघातातील नेमकी परिस्थिती याबाबत संबंधित प्रशासनाकडून अधिक माहिती समोर येणे बाकी आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number