जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षके-शिक्षकेतर कर्मचारी असे तब्बल 17 लाख कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून 7, 8 व 9 आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.
कर्मचारी समन्वय समितीने संपाचा निर्णय घेतला असून राजपत्रित अधिकारी महासंघाने मात्र संपातून माघार घेतली आहे.
जे जे रुग्णालयाचं काम ठप्प
- केवळ अत्यावश्यक ऑपरेशन सुरु आहेत
- रुग्णालयाच्या सर्व परिचारीका, सफाई कामगार, टेक्निशीयन, वॉर्ड बॉय संपावर गेले
रुग्णालयाने केलेल्या सुविधा
- बाहेरुन 120 प्रसिक्षीत परिचारीका बोलावण्यात आल्यात
- 200 इंटर्न शिकावू डॉक्टर्स
- बाहेरचे 34 सफाई बोलावण्यात आले
- 68 सेक्युरीटी गार्डही कामाला लावण्यात आलेत
औरंगाबाद घाटी रुग्णालयात परिचारिका, परिचारक, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा संप
- विविध मागण्यांसाठी करणार संप
- अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
- परिचरिकांच्या जागेवर नर्सिंगच्या वैद्यार्थिनींना करणार पाचारण
- नियमित शस्त्रक्रिया रद्द
काय आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
- सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा
- केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा
- अंशदायी पेंन्शन योजना रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा
- कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करा
- जवळपास 1 लाख 85 हजार रिक्त पदे भरा
- पाच दिवसाचा आठवडा करा
- भरतीमध्ये अनूकंपा धारकांना सहभागी करुन घ्या
कुठल्या विभागावर परिणाम पडणार –
- मंत्रालय कर्मचारी
- शासकीय रुग्णालयातील परिचारीका, वॉर्डबॉय, सफाई कामगार, टेक्निशीयन
- शासकीय मुद्रणालय
- वस्तू व कर विभाग
- सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर
- रेशनींग कार्यालये
- सरकारी कोषागारे
- शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी
- आरटीव्हो कार्यालयं
- राज्य उत्पादन शुल्क कार्यालय
- सर्व अनूदानीत आणि शासकीय प्राथमिक,माध्यमिक, ज्यू कॉलेज
- शासकीय दूध डेयरी