जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
काल मुंबईकरांवर परळ चेंगराचेंगरी दुर्घटनेनं मोठं संकट कोसळले. चेंगराचेंगरीत 26 निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला. तर, 39 जणांना गंभीर दुखापत झाली.
त्यामुळे अशा निष्पाप नागरिकांचा खून करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा का? असा सवाल जय महाराष्ट्रने उपस्थित केला.
त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते प्रदिप भालेकर यांनी रेल्वे स्टेशन मास्तरवर, आरपीएफ पोलीस अधिकाऱ्यांवर आणि रेल्वे मंत्रालयावर खुनाचा गुन्हा नोंदवला.
एडव्होकेट नितीन सातपुते यांनी याविरोधात क्रिमिनल जनहित याचिका दाखल केली. या दाखल केलेल्या याचिकेमुळे मात्र रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.