Elon Musk Super App : एलॉन मस्क यांचे आता येणार सुपर ॲप, असणार या खास सुविधा

मस्क यांची ही महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी झाल्यास, तंत्रज्ञान क्षेत्रातील मक्तेदारीचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते. युजर्सने प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ घालवावा आणि त्यातून कंपनीला अधिकाधिक...
Elon Musk Super App : एलॉन मस्क यांचे आता येणार सुपर ॲप, असणार या खास सुविधा

Elon Musk Super App : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि व्यावसायिक एलॉन मस्क आता त्यांच्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मला एका जागतिक 'सुपर ॲप'मध्ये रूपांतरित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताचे 'Umang' आणि चीनचे 'WeChat' ज्या धर्तीवर काम करतात, त्याच धर्तीवर मस्क यांना एक 'एव्हरीथिंग ॲप' (Everything App) विकसित करायचे आहे. 2022 मध्ये ट्विटरचे अधिग्रहण केल्यापासूनच मस्क यांनी या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली होती.

काय आहे सुपर ॲप आणि त्याची खासियत?
सुपर ॲप हे एक असे डिजिटल प्लॅटफॉर्म असते, जिथे युजर्सना मेसेजिंग, सोशल मीडिया, शॉपिंग आणि पेमेंट अशा अनेक सुविधा एकाच ठिकाणी मिळतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वेचे नवीन 'रेल वन' ॲप, ज्यामध्ये तिकीट बुकिंगपासून लाइव्ह स्टेटसपर्यंत सर्व माहिती मिळते. मस्क यांना 'X' ला केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित न ठेवता, युजर्सच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारे एक जागतिक केंद्र बनवायचे आहे. याद्वारे X च्या महसुलात मोठी वाढ होणार, हे नक्की आहे.

'X Money' आणि डिजिटल पेमेंटची क्रांती
मस्क यांच्या या मेगा प्लॅनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 'X Money'. पुढील महिन्यापासून याचे बीटा (Beta) व्हर्जन लॉन्च केले जाणार असून, याद्वारे युजर्सना मनी ट्रान्सफरची सुविधा मिळेल. यासाठी 'X' ने 'व्हिसा' (VISA) सारख्या जागतिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. आगामी काळात यात डिजिटल वॉलेट, स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या सेवांचाही समावेश असेल, ज्यामुळे युजर्स एकाच प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकतील.

हेही वाचा – Audi SQ8 Booking: 500 हॉर्सपॉवरची ताकद अन् लक्झरीचा कमाल अनुभव; Audi SQ8 कारचे बुकिंग सुरू; पाहा या 'सुपर कार'चे खास फीचर्स

मस्क यांचा ग्लोबल प्लॅन आणि आव्हाने
इलॉन मस्क यांना 'X' ला केवळ एका देशापुरते मर्यादित न ठेवता 'ग्लोबल सुपर ॲप' बनवायचे आहे. मात्र, हे साध्य करण्यासाठी त्यांना विविध देशांचे कडक डेटा प्रायव्हसी कायदे, वित्त नियम आणि विविध एजन्सींच्या परवानग्या मिळवाव्या लागतील. युजर्सने प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ घालवावा आणि त्यातून महसुलाचे नवीन मॉडेल उभे राहावे, हा मस्क यांचा मुख्य उद्देश आहे.

युजर्सना काय मिळणार?
'X' च्या या नवीन अवतारात मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसोबतच शॉपिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे. युजर्सना वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी ॲप्स वापरण्याची गरज उरणार नाही. मस्क यांची ही महत्त्वाकांक्षी झेप यशस्वी झाल्यास, तंत्रज्ञान क्षेत्रातील मक्तेदारीचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते आणि जगभरातील युजर्सना एक प्रगत डिजिटल इकोसिस्टम अनुभवायला मिळू शकते.

हेही वाचा – 6G Internet Service: इंटरनेटला आता 'सुपरसॉनिक' वेग, भारतात 6G इंटरनेट सेवा लवकरच सुरू होणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version