बंद घरात आढळला महिलेचा मृतदेह, पुण्यातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यात ज्येष्ठ महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय.   अरुणा धुरु असे मृत महिलेचे नाव आहे. धुरु या अविवाहित असून त्या लॉ कॉलेज रोड वरील राजभवन गल्लीमधील राहुल अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. गेले चार दिवस फ्लॅटचा दरवाजा बंद […]

बंद घरात आढळला महिलेचा मृतदेह, पुण्यातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यात ज्येष्ठ महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय.   अरुणा धुरु असे मृत महिलेचे नाव आहे. धुरु या अविवाहित असून त्या लॉ कॉलेज रोड वरील राजभवन गल्लीमधील राहुल अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या.

गेले चार दिवस फ्लॅटचा दरवाजा बंद होता. वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. घराचे सर्व दरवाजे आतून बंद होते त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडला असता, आत धुरु यांचा मृतदेह आढळला. गेल्या दहा वर्षांनपासून त्या एकट्याच राहत होत्या. मध्यंतरी त्यांची बहीण त्यांच्यासोबत राहत होती, मात्र बहिणीचे निधन झाल्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. पुण्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नसून या घटनेची माहिती मुंबईतील त्यांच्या भावाला कळविण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number