Badlapur Govinda Accident : बदलापूरच्या दहीहंडीत थरारक प्रसंग! सातव्या थरावरून गोविंदा थेट खाली कोसळला; सेफ्टी बेल्ट तुटल्याने घटना

बदलापूरमध्ये शिवसेना मितेश धुळे आयोजित माखन चोर दहीकाला उत्सवाात प्रज्वल प्रतिष्ठानच्या पथकाने सातव्या थराला सलामी दिल्यानंतर अचानक सेफ्टी बेल्ट तुटला आणि सातव्या थरावर असलेला चिमुकला थेट खाली कोसळला.

Badlapur Govinda Accident : बदलापूरच्या दहीहंडीत थरारक प्रसंग! सातव्या थरावरून गोविंदा थेट खाली कोसळला; सेफ्टी बेल्ट तुटल्याने घटना

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूरमध्ये 'माखन चोर दही काला उत्सवा'दरम्यान थरारक प्रसंग घडला आहे. बदलापूरमध्ये शिवसेना युवा सेना शहर प्रमुख मितेश धुळे यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’ दरम्यान एक लहान गोविंदा सातव्या थरावरून थेट खाली कोसळला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या माखन चोर दहीकाला उत्सवात प्रज्वल प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोविंदांनी सात थरांची सलामी देण्यात आली. यावेळी सातव्या थराला सलामी दिल्यानंतर अचानक सेफ्टी बेल्ट तुटल्यामुळे सातव्या थरावर असलेला चिमुकला थेट खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि गोविंदांमध्ये काही काळ खळबळ उडाली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- Mumbai Parelcha Maharaja : मोठी बातमी! मुंबईत परळच्या महाराजांच्या आगमन सोहळ्यात मोठी दुर्घटना टळली; विजेच्या खांबातून ठिणग्या अन्…

याठिकाणी लावलेला सेफ्टी बेल्ट का तुटला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या आयोजकांकडून हा प्रकार कसा घडला, याची चौकशी केली जात आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मोठ्याप्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा होतो. यंदा 5 सप्टेंबरला दहीहंडी आहे. मुंबई आणि ठाण्यात विविध राजकारण्यांकडून लाखो रुपयांची बक्षिसं असलेले दहीहंडी उत्सव आयोजित केले जातात. मात्र, या दहीहंडी अत्यंत उंचावर असल्याने गोविंदा पथकांना नऊ ते दहा थर लावावे लागतात. या प्रयत्नात दरवर्षी दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी होतात.

दहीहंडी उत्सवात उंच थर रचताना गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टसह विविध सुरक्षा उपाययोजना केल्या जातात. मात्र, सातव्या थराला सलामी दिल्यानंतरच सेफ्टी बेल्ट तुटल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दहीहंडी उत्सवाला अवघे काही दिवस असताना या घटनेमुळे यामुळे पुन्हा एकदा गोविंदा पथकातील तरुण आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अलीकडच्या काळात सर्वात वरच्या थरावर चढणाऱ्या चिमुकल्या गोविंदांसाठी सेफ्टी बेल्ट हा अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, बदलापूरमध्ये सेफ्टी बेल्टच तुटल्याने गोविंदाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number