जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूमागच्या रहस्याचा गुंता वाढत चालला आहे. पोस्टमार्टमच्या अहवालानंतर दुबई पोलिसांनी अनेक दृष्टीकोनाने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. श्रीदेवींच्या मृत्यू दरम्यान बोनी कपूर कुठे होते? याची विचारणा बोनी कपूर यांना करण्यात आली आहे. काही वेळेच्या चौकशीनंतर बोनी कपूर यांना सोडण्यात आले. अशी माहिती मिळतं आहे.
सुत्रांनुसार, श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे पुन्हा एकदा पोस्टमार्टम करण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांच्या कॉल रेकॉर्डसची पडताळणी केली जाणार आहे. श्रीदेवीच्या कुटुंबीयांची आणि त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या तेथिल हॉटेल कर्मचार्यांची चौकशी सुरू केली आहे. लग्न समारंभत उपस्थित सर्व कपूर परिवारासह मोहित मारवाह आणि त्याच्या कुटुंबाचीही चौकशी करण्यात आली आहे. सीसीटिव्हीचा तपासही सुरू आहे. दरम्यान श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास मनाई केली आहे.
दुबईतीलहॉटेल अमिरात टॉवरच्या रूम नंबर २२०१ मध्ये श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला होता. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, वैद्यकीय अहवालानंतर त्यांचा मृत्यू बाथ टबमध्ये बुडून झाल्याचं म्हटलं.
श्रीदेवीच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं?तिच्यासोबत त्या वेळी कोण होतं?याचा तपास सुरू आहे. पोस्ट मार्टम रिपोर्टनंतर याला वेगळे वळण लाभले आहे. यांनंतरहू काय धागे-दोरे बाहेर निघतात की नाही हे पहान गरजेच ठरणार आहे.