जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
होळी साजरी करण्यासाठी, दारू पिऊन नदीमध्ये पोहायला उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ येथे घडली आहे.
उल्हासनगरमधील रहिवासी रवींद्र शिवप्रसाद कुमार आणि हिरा आहुजा हे त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी अंबरनाथमधील वसार गाव येथे आले होते. तिथे ते दारू प्यायले, आणि नदीत पोहायला उतरले, मात्र नशेच्या अवस्थेत त्यांना नदीच्या पात्राचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते दोघेही नदीत बुडाले. तेथिल स्थानिक लोकांनी त्यांना बाहेर काढून अंबरनाथ पालिकेच्या छाया हॉस्पिटल मध्ये दाखल केले , मात्र तोपर्यंत त्या दोघांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या मित्रांनी केला आहे.