साईचरणी ४७ कोटींचे दान

शिर्डी साईबाबांच्या चरणी भाविक भरभरुन दान करत असल्याच पुन्हा समोर आलं आहे. २५ एप्रिल ते १५ जून या दिड महिन्याच्या काळात तब्बल ४७ कोटीचे साईचरणी भाविकांनी अर्पण केल आहे. या दिड महिन्यात तब्बल 26 लाख भाविक साईचरणी नतमस्तक झाले आहेत. साईबाबांच्या चरणी वर्षभरात करोडो भाविक हजेरी लावतात. त्यात सन उत्सव आणि सुट्यांच्या काळात भाविकांची मोठी […]

साईचरणी ४७ कोटींचे दान

शिर्डी साईबाबांच्या चरणी भाविक भरभरुन दान करत असल्याच पुन्हा समोर आलं आहे. २५ एप्रिल ते १५ जून या दिड महिन्याच्या काळात तब्बल ४७ कोटीचे साईचरणी भाविकांनी अर्पण केल आहे. या दिड महिन्यात तब्बल 26 लाख भाविक साईचरणी नतमस्तक झाले आहेत.

साईबाबांच्या चरणी वर्षभरात करोडो भाविक हजेरी लावतात. त्यात सन उत्सव आणि सुट्यांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी २५ एप्रिल ते १५ जून या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल २६ लाख भाविक साई चरणी नतमस्तक झाले. अवघ्यादिड महिन्याच्या कालावधीतच ४७ कोटीचे दान आले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने दोन हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत चलनात राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ह्या दिड महीन्याच्या कालावधीत साईभक्तांनी साईचरणी दोन कोटी चाळीस लाख रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा अर्पण केल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number