US Visa Policy : मधुमेह आणि हृदयरोग असणाऱ्यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला जाणार? ट्रम्प प्रशासनाने उचलले ‘हे’ पाऊल

नवीन धोरणानुसार, व्हिसा अधिकाऱ्यांना स्पष्टपणे अशा अर्जदारांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांच्या आजारपणावरील उपचारांसाठी भविष्यात लाखो डॉलर्सचा खर्च येऊ शकतो.
US Visa Policy : मधुमेह आणि हृदयरोग असणाऱ्यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला जाणार? ट्रम्प प्रशासनाने उचलले ‘हे’ पाऊल

Donald Trump Immigration Policy Changes : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक मोठे आणि आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. आता त्यांच्या प्रशासनाने आणखी एका महत्त्वाच्या धोरणाची घोषणा केली आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अमेरिकेत स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांना आता मधुमेह (Diabetes) आणि हृदयरोग (Heart Disease) यांसारख्या पूर्वीपासून असलेल्या दीर्घकालीन आजारांमुळे व्हिसा आणि ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (US State Department) ही मार्गदर्शक तत्त्वे जगभरातील अमेरिकन दूतावास आणि कॉन्सुलर कार्यालयांना पाठवली आहेत.

कोणते आजार असतील तर व्हिसा मिळणार नाही?
नवीन धोरणानुसार, व्हिसा अधिकाऱ्यांना स्पष्टपणे अशा अर्जदारांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांच्या आजारपणावरील उपचारांसाठी भविष्यात लाखो डॉलर्सचा खर्च येऊ शकतो. परराष्ट्र विभागाने नमूद केलेल्या आजारांच्या यादीत खालील बाबींचा समावेश आहे:

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, श्वसन आजार (Respiratory Illnesses), कर्करोग (Cancer), मधुमेह, चयापचयासंबंधी आजार (Metabolic Disorders), न्यूरोलॉजिकल आजार (Neurological Disorders), मानसिक आजार (Mental Illnesses) असे आजार असलेल्यांना इथून पुढे व्हिसा मिळणे कठीण होणार आहे. याशिवाय, या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अधिकाऱ्यांना लठ्ठपणासारख्या (Obesity) परिस्थितींचाही विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण लठ्ठपणामुळे दमा, स्लीप एपनिया आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार होऊ शकतात, ज्यांच्या उपचारांवर मोठा खर्च येतो.

हेही वाचा – US Boycott G20 Summit: दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेवर अमेरिकेचा बहिष्कार; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं कारण

आर्थिक स्थिती ठरणार 'स्थलांतराचा' आधार
या सर्व दीर्घकालीन आजारांचे मूल्यांकन आता या संभाव्य संकेतांवर केले जाईल की, एखादी व्यक्ती भविष्यात अमेरिकेवर आर्थिक भार (Financial Burden) बनू शकते का?
आर्थिक संसाधनांचीही चौकशी: नव्या निर्देशांनुसार व्हिसा अधिकाऱ्यांना स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, त्यांनी अर्जदारांकडे सरकारी मदतीशिवाय त्यांच्या संपूर्ण अपेक्षित आयुष्यभर अशा दीर्घकालीन वैद्यकीय सेवेचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक संसाधने आहेत का, याची कसून चौकशी करावी.
कोणासाठी लागू: तांत्रिकदृष्ट्या हे निर्देश सर्व व्हिसा अर्जदारांना लागू होतात. तरीही, हे निर्देश प्रामुख्याने अमेरिकेत कायमचे वास्तव्य (Permanent Residence) करू इच्छिणाऱ्यांसाठी लागू होणे अपेक्षित आहे.

इमिग्रेशन तज्ज्ञांचा युक्तिवाद आहे की, या धोरणामुळे वृद्ध अर्जदार आणि सामान्य दीर्घकालीन आजार असलेल्यांचे कायदेशीर स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी होईल; तर, दुसरीकडे हे धोरण केवळ श्रीमंत आणि निरोगी अर्जदारांसाठी अनुकूल ठरेल.

हेही वाचा – Donald Trump यांचा नवा दावा; 'भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली!' म्हणाले, 'मोदी एक महान व्यक्ती'

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version