‘डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर आहे’ – नितीन गडकरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विकासाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षियांचेच कान उपटले आहेत. डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर आहे असं नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितल. अरुंद रस्ते, घाण, अनधिकृत बांधकामं यांना तेथील लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद आहे, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा […]

‘डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर आहे’ – नितीन गडकरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विकासाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षियांचेच कान उपटले आहेत. डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर आहे असं नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितल. अरुंद रस्ते, घाण, अनधिकृत बांधकामं यांना तेथील लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद आहे, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद आयोजित करण्यात आला होता. या संवादात डोंबिवली शहर मुंबईच्या जवळ असतानाही शहराचा म्हणावा तसा विकास होत नाही आणि अनेक महत्त्वाचे प्रकल्प येऊ घातलेले असतानाही ते मार्गी का लागत नाही? असा प्रश्न एका विद्यार्थिनीने गडकरींना विचारला. यावर बोलताना गडकरी यांनी सुरुवातीलाच डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं एक घाणेरडं शहर आहे, असं विधान केलं. शिवाय, जे प्रतिनिधी शहराचा योग्य विकास करत नाहीत, त्यांना निवडून का देता? असा सवाल करत यात लोकांचीच चूक असल्याचं गडकरी म्हणाले.

शहराच्या विकासासाठी अनेकदा हितसंबंध दुखावले जातात याचच उदाहरण देताना त्यांनी स्वत:च्या सासऱ्यांचं घर पाडलं होतं, त्यानंतर त्यांनाही घरात बायकोची नाराजी सोसावी लागली होती,” असं गडकरी म्हणाले.

गडकरींच्या या पावित्र्याने डोंबिवलीत मात्र खळबळ माजली. कारण, कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. शिवाय डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण हे सध्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे कामं न करणाऱ्यांना आपल्या स्पष्ट वक्तेपणाने गडकरींनी फैलावर घेतल्याची चर्चा एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे डोंबिवलीला घाणेरडं शहर म्हटल्याने डोंबिवलीकरांचा स्वाभिमानही दुखावला गेला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number