Stray Dog Attack a Girl : ‘ती’ चिमुरडी सापडली पाच भटक्या कुत्र्यांच्या तावडीत; नंतर जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी एका गल्लीत खेळताना दिसते, त्यावेळी अचानक चार कुत्रे तिच्याकडे धावत येतात.
Stray Dog Attack a Girl :  ‘ती’ चिमुरडी सापडली पाच भटक्या कुत्र्यांच्या तावडीत; नंतर जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा

Dog Attack On Little Girl: पुण्यातील वडगाव शेरी परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी एका गल्लीत खेळताना दिसते, त्यावेळी अचानक चार कुत्रे तिच्याकडे धावत येतात. भटकी कुत्री मुलीला काही अंतर ओढून नेतात. यावेळी दोन स्थानिक नागरिकांनी धैर्य दाखवत कुत्र्यांना घटनास्थळावरून पळवून लावले. त्यानंतर त्यांनी मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Leopard Attack In Gondia: गोंदियात 5 वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला; ग्रामस्थ संतप्त, रस्ता रोखून केला निषेध

दरम्यान, स्थानिकांनी सांगितले की, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच चिखली मोरे वस्ती येथे सकाळी 5 वाजताच्या सुमारास कामावर जात असलेल्या एका तरुणावर सात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तरुणाने फ्लेक्स बोर्ड आणि मोटारसायकलचा उपयोग करून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तो जखमी झाला. स्थानिक रहिवाशांनी कुत्र्यांना पळवून लावले. ही घटना देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

हेही वाचा – Private Travels: दिवाळीत खासगी बस भाड्यात तिपटीने वाढ; मुंबई, नागपूर प्रवासासाठी आता मोजावे लागणार इतके रुपये

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे रहिवाशांमध्ये चिंता आणि भीती वाढली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे या समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वडगाव शेरीसह परिसरातील रहिवासी सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्याची शिफारस करत आहेत. प्रशासनाने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, असं आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version