तुम्हाला माहीत आहे, ‘इथे’ अशी साजरी होते दिवाळी

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. हा सण भारतात तर सर्वत्र साजरा होतो. तसंच भारताबाहेर नेपालमध्येही दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरी करतात. राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी हा सण साजरा केला जातो. हरियाणा दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो. उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व […]

तुम्हाला माहीत आहे, ‘इथे’ अशी साजरी होते दिवाळी

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. हा सण भारतात तर सर्वत्र साजरा होतो. तसंच भारताबाहेर नेपालमध्येही दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरी करतात. राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी हा सण साजरा केला जातो.

हरियाणा
दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो.

उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात.

राजस्थान
राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला,त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर ‘घुड्ल्या’ घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात. प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसर्‍या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.

पंजाब
पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.

गोवा
गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात.

दक्षिण भारत
दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.

नेपाळ
नेपाळमधील लक्ष्मीपूजन
नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number