Diwali Bonus: दिवाळीचा सण फक्त काही दिवसांवर आला आहे. अशातचं आता म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ने यंदा कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा – Mumbai Local: नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! सीवूड्स-उरण मार्गावर 20 नवीन लोकल फेऱ्या सुरू
दरम्यान, 2024 मध्ये म्हाडा कर्मचाऱ्यांना 23 हजार रुपये दिवाळी बोनस मिळाला होता. यंदा कर्मचाऱ्यांनी आणि अधिकारी संघटनांनी बोनस वाढवावा अशी मागणी केली होती. त्यानुसार, प्राधिकरणाने शेवटी 25 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
याशिवाय, मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही यंदा दिवाळी बोनस मिळणार आहे. गेल्या वर्षी महापालिका कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपये बोनस देण्यात आले होते, तर यंदा 500 ते 1 हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनेने 66 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती, परंतु ती मान्य होणे शक्य नाही. तरीही यंदा वाढीव रक्कम मिळणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.