Bhiwandi Building Collapses : इमारतीचा ‘धोकादायक’ यादीत समावेश, तरीही नागरिकांचे वास्तव्य, मृतांचा आकडा 9 वर; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू

भिवंडी : भिवंडी शहरात काल रात्री उशिरा ‘कोहिनूर’ ही चार मजली इमारत कोसळल्याने किमान 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबवले जात आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर […]

Bhiwandi Building Collapses :  इमारतीचा ‘धोकादायक’ यादीत समावेश, तरीही नागरिकांचे वास्तव्य, मृतांचा आकडा 9 वर; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू

भिवंडी : भिवंडी शहरात काल रात्री उशिरा ‘कोहिनूर’ ही चार मजली इमारत कोसळल्याने किमान 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबवले जात आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. इमारत कोसळण्याच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींसाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा : Thane Bhiwandi Building Collapse: भिवंडीत चार मजली इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती तर मृतांच्या आकड्यात वाढ

पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, स्थानिक महानगरपालिकेने ही इमारत जीर्ण (धोकादायक) म्हणून घोषित केली होती. त्यांनी पुढे सांगितले की, काही कुटुंबे आधीच तिथून स्थलांतरित झाली होती, मात्र काहींनी जाण्यास नकार दिला होता. मानवी जीव अमूल्य आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी महानगरपालिकेच्या आदेशांचे पालन करावे आणि आवश्यक दुरुस्तीचे काम सुरू असताना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. इमारतीत काही लोकांचे वास्तव्य असतानाही दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number