जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई-लातूर-मुंबई रेल्वे बीदरपर्यंत घेवून जाण्याच्या निर्णयाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी तीव्र विरोध केला आहे.
मुंबई-लातूर-मुंबई ही रेल्वे बीदर ऐवजी परळीपर्यंत विस्तारीत करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली.
या मागणीसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू धनंजय मुंडेंची भेट घेणार आहेत. याआधी मुंबई-लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत वाढवल्यानं बचाव कृती समितीच्या वतीनं लातूर बंदचे आवाहन करण्यात
आले होते.
हा प्रवास बीदरपर्यंत झाल्यामुळे प्रवाशांना रेल्वेत पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे मुंबई-लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत घेऊन जाऊन नये या मागणीसाठी धनंजय मुंडे रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.