वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टिकली, काजळला जीएसटीतून वगळलं मग सॅनिटरी नॅपकीनला का नाही?, असा शब्दात दिल्ली उच्च न्यायालायानं केंद्र सरकारला फटकारलंय.
सॅनिटरी नॅपकीनवर 12 टक्के जीएसटी लागू आहे. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. सॅनिटरी नॅपकीन ही महिलांची गरज असून, त्याला जीएसटीतून वगळण्याची मागणी होतेय.
या याचिकेवर 14 डिसेंबरला पुढील सुनवाणी होणार आहे. महाराष्ट्रामधूनही या अनेक महिला संघटना या विषयी आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान जय महाराष्ट्रनंही करमुक्त पॅडसाठी विशेष मोहीम लावून धरलीये. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे आता लक्ष लागलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.