Delhi Bomb Threat: दिल्ली विमानतळ आणि शाळांना ई-मेलद्वारे बॉम्ब धमक्या; पोलीस सतर्क, चौकशी सुरू

दिल्ली विमानतळ, शाळा आणि विविध संस्थांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Delhi Bomb Threat: दिल्ली विमानतळ आणि शाळांना ई-मेलद्वारे बॉम्ब धमक्या; पोलीस सतर्क, चौकशी सुरू

Delhi Bomb Threat: राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्ली विमानतळ, शाळा आणि विविध संस्थांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, प्राथमिक तपासात आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

याआधीही मिळाल्या होत्या धमक्या

बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्याची ही पहिली घटना नाही. 20 सप्टेंबर रोजी दिल्लीतील डीपीएस द्वारका, कृष्णा मॉडेल पब्लिक स्कूल आणि सर्वोदय विद्यालय यांसारख्या नामांकित शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यावेळी बॉम्ब शोधक पथकांनी शाळांची तपासणी केली, तसेच खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. मात्र, नंतर ती धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – Chaitanyanand Saraswati : बनावट पासपोर्ट, खोटे कार्ड आणि कोट्यवधींचा घोटाळा; चैतन्यानंद सरस्वती पोलिसांच्या तावडीत

पूर्वीच्या घटनांची पार्श्वभूमी

दरम्यान, अशा धमक्या दिल्लीतच नव्हे तर देशातील इतर ठिकाणीही वारंवार दिल्या जात आहेत. जुलै 2025 मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती, परंतु तपासानंतर ती अफवा ठरली. त्याच महिन्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला सलग काही फोन करून विमान व विमानतळ उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तपासानंतर त्या देखील फक्त खोट्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं. अगदी मुंबई उच्च न्यायालयालाही धमकीचा मेल पाठवण्यात आला होता, पण ती देखील निराधार निघाली.

हेही वाचा –Karur Stampede: करूरमधील चेंगराचेंगरीमागे कट…; अभिनेता विजयने घेतली उच्च न्यायालयात धाव 

पोलिसांचे आवाहन

तज्ज्ञांच्या मते, अशा ई-मेल किंवा फोनद्वारे मिळणाऱ्या खोट्या धमक्या जरी वारंवार उघड होत असल्या तरी कुठलीही सूचना दुर्लक्षित करता येणार नाही. कारण, थोडासा निष्काळजीपणा झाला तरी मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे पोलीस प्रत्येक तक्रारीची गंभीरपणे चौकशी करत असतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version