Delhi Blast Update: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या स्फोटाचा मुख्य सूत्रधार पुलवामाचा रहिवासी आणि व्यवसायाने डॉक्टर असलेला उमर नबी उर्फ डॉ. उमर मोहम्मद असल्याचे उघड झाले आहे. तथापी, आत्मघाती स्फोटात डॉ. उमरचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तथापी, पोलिसांनी त्याचा मृतदेह ओळखण्यासाठी त्याच्या आईचा DNA नमुना घेतला आहे. दरम्यान, तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. उमरने 2021 मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानेच डॉ. मुझम्मिल आणि डॉ. आदिल या दोन तरुण डॉक्टरांना संघटनेत भरती केले. पोलिसांच्या मते, उमरने अनंतनाग येथील रुग्णालयातील लॉकरमध्ये एके-47 रायफल लपवून ठेवली होती.
फरिदाबादमध्ये स्फोटकांचे जाळे
अनंतनागहून परतल्यावर उमरने फरिदाबादच्या दौज आणि फतेहपूर तागा गावात भाड्याने खोल्या घेतल्या. इथेच त्याने आणि मुझम्मिलने मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट आणि स्फोटक साहित्य साठवले.
कटाचा उलगडा कसा झाला?
फरिदाबाद मॉड्यूलचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा जम्मू-काश्मीर पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात खोऱ्यातील दहशतवादी पोस्टर प्रकरणात चौकशी सुरू केली. 30 ऑक्टोबरला पोलिसांनी डॉ. मुझम्मिलला अटक केली, आणि त्याच चौकशीतून डॉ. उमर मोहम्मदचे नाव समोर आले. पुढील तपासात हे दोघे दिल्ली बॉम्बस्फोटाशी थेट संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.
कुटुंबीयांचा खुलासा
तथापी, माध्यमांशी बोलताना उमरच्या काकू तबस्सुम यांनी सांगितले की, “उमर दोन महिन्यांपूर्वी घरी आला होता आणि अनंतनागमध्ये काम करत होता.” तथापी, मुझम्मिलच्या कुटुंबानेही प्रतिक्रिया देताना सांगितले की, “तो चार वर्षांपूर्वी घर सोडून गेला होता. त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झाला नाही.”
हेही वाचा – Delhi Car Blast: कट उघड झाल्याने केला आत्मघातकी हल्ला; फरिदाबाद मॉड्यूलबाबत मोठा खुलासा
विद्यापीठातील सहकाऱ्यांची चौकशी सुरू
याशिवाय, फरिदाबाद पोलिसांनी अल फलाह विद्यापीठात मोठी कारवाई केली आहे. मुझम्मिलच्या सहाध्यायी, प्राध्यापक आणि विद्यापीठ प्रशासनातील लोकांची चौकशी करण्यात आली. एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जवळपास 52 लोकांची चौकशी सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.