दीपिका पादुकोणच्या वडिलांना कोरोनाची लागण

भारतात कोरोनामुळे परिस्थिती फारच गंभीर झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय . त्यामुळे अनेकजणांना कोरोनाची लागण होत आहे. सर्वसामान्य पासून तर नेता, सेलिब्रिटी पर्यंत हा कोरोना पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण वडील माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

दीपिका पादुकोणच्या वडिलांना कोरोनाची लागण

भारतात कोरोनामुळे परिस्थिती फारच गंभीर झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय . त्यामुळे अनेकजणांना कोरोनाची लागण होत आहे. सर्वसामान्य पासून तर नेता, सेलिब्रिटी पर्यंत हा कोरोना पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण वडील माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण आणि बहिण अनिशा पादुकोण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची तब्येत चांगली आहे. शिवाय ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. असं सांगितलं जात आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्याची शक्यता आहे. अद्याप दीपिकाकडून याबाबत कोणतीही प्रकारची माहिती दिली नाही आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बऱ्याच सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे आणि अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर मात केली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number