Bhimashankar Temple : मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय! व्हीआयपींना देवस्थानचा दणका; आता सर्वसामान्य आणि व्हीआयपी घेणार एकाच रांगेतून दर्शन

Bhimashankar Temple : मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय! व्हीआयपींना देवस्थानचा दणका; आता सर्वसामान्य आणि व्हीआयपी घेणार एकाच रांगेतून दर्शन

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत आता व्हीआयपी दर्शन बंद होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व भाविकांना एकाच नियमातून दर्शनाची सुविधा मिळणार आहे. दर्शन व्यवस्थेत समानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय लागू करण्यात आला. सध्या 24 तारखेपर्यंतचे सर्व ॲानलाईन बुकिंग स्लॉट भरले असून भाविकांनी किमान दोन दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंग करूनच दर्शनासाठी यावे, असे आवाहन देवस्थान प्रशासनाकडून करण्यात आले. याबाबतची माहिची भीमाशंकर देवस्थानचे मुख्य विश्वस्त मधुकर गवांदे यांनी दिली. 

हेही वाचा : Amol Kolhe Big Announcement : ‘मी सावित्रीबाई..’ मालिका पुन्हा सुरू होतेयं, अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा; अचानक बंद झालेल्या मालिकेबाबत मोठा खुलासा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version