जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा आज अखेर लिलाव झालाय.
त्याच्या रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या तिन्ही मालमत्तांचा 11.50 कोटीत लिलाव झाला असून सैफी बुऱ्हाणी ट्रस्टने दाऊदच्या मालमत्ता विकत घेतल्यायेत.
दरम्यान, हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांना या लिलावात अपयश आल्याने दाऊदच्या हॉटेलवर शौचालय उभारण्याचं त्यांचं स्वप्न भंगलय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.