Ratnagiri Crime: सासुरवाडीत पाहुणा म्हणून आला अन् दागिने घेऊन पसार झाला! लाखोंचा ऐवज लंपास, 12 तासांत पर्दाफाश

दापोली तालुक्यातील पालगड कातळवाडी येथे घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली होती.

Ratnagiri Crime: सासुरवाडीत पाहुणा म्हणून आला अन् दागिने घेऊन पसार झाला! लाखोंचा ऐवज लंपास, 12 तासांत पर्दाफाश

दापोली/रत्नागिरी : दापोली तालुक्यातील पालगड कातळवाडी येथे घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा दापोली पोलिसांनी अवघ्या 12 तासांत छडा लावला असून, चोरीच्या प्रकरणात घरातीलच जावयाचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चोरीला गेलेला मुद्देमालही जप्त केला आहे.

हेही वाचा: FDA Action On Domino's Outlets : पिझ्झाप्रेमींनो लक्ष द्या! अस्वच्छतेच्या कारणास्तव डोमिनोज पिझ्झाच्या 'या' तीन आउटलेट्सचा परवाना रद्द; FDA चा दणका

घरातील दागिने चोरीला

मिळालेल्या माहितीनुसार, पालगड कातळवाडी येथील शुभांगी विष्णू दळवी यांच्या घरात मंगळवारी, 11 ऑगस्ट रोजी चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील बेडरूममध्ये ठेवण्यात आलेल्या पिशवीत सोन्याच्या दागिन्यांची पर्स होती. या पर्समध्ये तब्बल 7 लाख 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरट्याने घराच्या मागील बाजूला असलेल्या स्वयंपाकघरातील स्लायडिंग खिडकीचा वापर करून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन दागिने असलेली पर्स घेऊन आरोपी पसार झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले.

पोलिसांची वेगाने तपासाची चक्रे

घरफोडीची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी विविध बाबींची पडताळणी केली. चोरीची पद्धत आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास पुढे नेत पोलिसांनी संशयित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान चोरीच्या घटनेत फिर्यादीचा जावई विजय जयराम नामुगडे याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा: Crime News : चारित्र्याच्या संशयावरून भयंकर कृत्य, मुलांदेखतच पतीने पत्नीवर पेट्रोल ओतून पेटवून दिले; महिलेचा मृत्यू

चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती आहे. अवघ्या 12 तासांत चोरीचा तपास पूर्ण करून मुद्देमाल हस्तगत केल्याने दापोली पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number