Dahi Handi 2026: दहीहंडीचा पुण्यातील वाहतुकीवर परिणाम! 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान PMPMLच्या बसमार्गांत मोठे बदल

पुणे : दहीहंडीमुळे पुणे-पिंपरी चिंचवडमधील काही रस्ते बंद करण्यात येणार आहेत.

Dahi Handi 2026: दहीहंडीचा पुण्यातील वाहतुकीवर परिणाम! 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान PMPMLच्या बसमार्गांत मोठे बदल

पुणे: दहीहंडीमुळे पुणे-पिंपरी चिंचवडमधील काही रस्ते बंद करण्यात येणार आहेत. यामुळे बसवाहतूक सेवा विस्कळीत होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) काही बसमार्गांच्या वेळापत्रकात आणि बसस्थानकांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार 3, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी विविध बसमार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

काय आहेत बदल?
मार्ग क्रमांक 7 आणि 202 या बस 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर ते 4 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत रस्ता बंद झाल्यानंतर दोन्ही दिशेने स्वारगेट आणि टिळक रस्त्याने धावतील.

मार्ग क्रमांक 7, 68 आणि 202 या बसेस 3 आणि 4 सप्टेंबर रोजी रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट आणि टिळक रोडमार्गे धावतील.

मार्ग क्रमांक 8, 9, 57, 81, 94, 108, 143, 144 आणि 283 या बसेस डेक्कन जिमखाना, मनपा भवन आणि गाडीतळ (जुना बाजार) मार्गे धावतील.

मार्ग क्रमांक 113 (अ. ब. चौक-सांगवी) या मार्गावरील बस महापालिका भवनाजवळील नदीकाठी असलेल्या बसस्थानकावरून सुरू राहतील.

हेही वाचा: Dahihandi 2026: गोविंदांना राज्य सरकारचे 10 लाखांचे 'सुरक्षा कवच'; विम्याचा लाभ कसा घ्यायचा? जाणून घ्या प्रक्रिया

वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार हे बदल करण्यात आले आहेत. उत्सवादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पीएमपीएमएलने पर्यायी बसस्थानके आणि मार्गांमध्ये हे बदल केले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या बसप्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number