प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णींना जामीन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय. ठेवीदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एक हजार 340 हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर दाखल करण्यात आलाय.  या प्रकरणात अटकपूर्व […]

प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णींना जामीन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय.

ठेवीदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एक हजार 340 हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर दाखल करण्यात आलाय. 

या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांनी पुणे विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी बुधवारी तो फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कुलकर्णी दाम्पत्याच्या वतीनं अॅडवोकेट श्रीकांत शिवदे, गिरीष कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर कुलकर्णी दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आलाय.

त्यामुळं काय होणार गुंतवणूकदारांचं असा सवाल विचारण्यात येतोये. कारण मलमतात जप्त करुन बँकांची वसुली होणार खरी. मात्र, त्यानंतर गुंतवणुकदारांचे पैसे त्यांना परत मिळणार तरी कसे असा सवाल सर्व सामान्य गुंतवणुक दारांकडून विचारण्यात येतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number