निरोगी हृदयासाठी या पदार्थांचे सेवन करा

बदलते जीवन आणि बदलता आहार यामुळे आपल्याला वेगवेगळ्या शारीरिक समस्या उदभवू लागतात. यातही सध्या हृदयविकाराच्या समस्या तरुण वर्गात जास्त दिसून येत आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम, धूम्रपान, दारूचे सेवन. तर आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या 5 आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा. अक्खे दाणे अक्खे दाणे, तपकिरी तांदूळ आणि क्विनोआसारखे धान्य हे […]

निरोगी हृदयासाठी या पदार्थांचे सेवन करा

बदलते जीवन आणि बदलता आहार यामुळे आपल्याला वेगवेगळ्या शारीरिक समस्या उदभवू लागतात. यातही सध्या हृदयविकाराच्या समस्या तरुण वर्गात जास्त दिसून येत आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम, धूम्रपान, दारूचे सेवन. तर आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या 5 आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा.

अक्खे दाणे

अक्खे दाणे, तपकिरी तांदूळ आणि क्विनोआसारखे धान्य हे फायबरचे चांगले स्रोत आहेत. ते आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

जवस

रोज एक चमचा जवस खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन, यूएस मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार दररोज चार चमचे जवस खाल्याने उच्च रक्तदाब कमी करू शकतो.

सुका मेवा

सुका मेवा हा मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडने समृद्ध असतो असतात. हे सर्व घटक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. बदाम, अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्यात अँटिऑक्सिडेंट आणि खनिज गुणधर्म असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

बीटचा रस

बीटचा रस रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो त्यामुळे निरोगी हृदयासाठी ते चांगले आहे. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या अभ्यासानुसार, दररोज एक ग्लास बीटाचा रस प्यायल्याने रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number