‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्यानंतर एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री कंगना राणावतने वादग्रस्त विधान केले आहे. ‘१९४७ साली देशाला भीक मिळाली, देशाला स्वातंत्र्य २०१४साली मिळाले’, असे वादग्रस्त विधान कंगनाने केले. कंगनाच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तसेच कंगनाच्या विरोधात राज्यात निषेध व्यक्त होताना दिसत आहे. कंगना राणावतने केलेल्या या वादग्रस्त विधानाचा निषेध करत कंगना विरोधात काँग्रेस नेते तक्रार दाखल करणार आहेत.
कंगना राणावतचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, भाजपची पोपट कंगना राणावतचे करायचे काय, कंगना माफी मागो, कंगनाचा धिक्कार असो अशा शब्दांत घोषणाबाजी करत कंगनाविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानामुळे कंगनाच्या घराबाहेरही निदर्शने करण्यात आली.