काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतिल सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या दोन दिवसांपूर्वी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी यांच्या सोबत आल्या होत्या. येथील कार्यक्रम संपवून […]

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतिल सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या दोन दिवसांपूर्वी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी यांच्या सोबत आल्या होत्या. येथील कार्यक्रम संपवून त्या पुन्हा दिल्लीला गेल्या होत्या. आज सकाळी त्यांना बरे वाटत त्यांना दिल्लीतिल सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना ताप आल्याची माहिती असून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. दरम्यान, कॉँग्रेसचे बडे नेते त्यांच्या भेटीला दवाखान्यात गेले असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number